Share

IPL 2022 SRH vs RCB : हार्टब्रेकिंग..! विराट कोहली पुन्हा Golden Duckवर बाद; पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज रविवारी दुपारी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (SRH vs RCB) यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यंदाच्या हंगामात विराट तिसऱ्यांदा गोल्डन डकवर (Golden Duck) बाद झाला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात बंगळुरूचा कप्तान फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

आज विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी बंगळुरुसाठी सलामी दिली. हैदराबादकडून फिरकीपटू जगदीश सुचितने पहिले षटक टाकले. सुचितने पहिल्याच चेंडूवर विराटला शॉर्ट मिडविकेटकडे तैनात असलेल्या कप्तान केन विल्यमसनकरवी झेलबाद केले. हैदराबादविरुद्धच्या आधीच्या सामन्यात विराट मार्को जानसेनच्या गोलंदाजीवर गोल्डन डकचा बळी ठरला होता.

https://twitter.com/ashMSDIAN7/status/1523243182363791360

आज हैदराबादकडून फजलहक फारुकी हा अफगाणी खेळाडू सामना खेळत आहे. या हंगामात उभय संघांमधील शेवटच्या सामन्यात आरसीबी केवळ ६८ धावांवर ऑलआऊट झाला आणि त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आयपीएलच्या १५व्या हंगामात, बंगळुरू ११ सामन्यांतून ६ विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर सनरायझर्स हैदराबाद १० सामन्यांतून ५ विजयांसह सहाव्या स्थानावर आहे.

दोन्ही संघांची Playing 11
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंह, जगदीशा सुचित, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, उमरान मलिक.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कप्तान), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!