मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये समालोचन करणाऱे टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आपल्या मस्त शैलीसाठी ओळखले जातात. शास्त्री विविध कारणांमुळे चर्चेत असतात. यावेळी शास्त्रींची एक जाहिरात व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये ते पार्टी बॉयच्या रुपात दिसत आहेत. शास्त्री सध्या आयपीएलमध्ये व्यस्त असले तरी याच दरम्यान एका जाहिरातीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत शास्त्री पार्टी करताना दिसत आहेत. रवी शास्त्री जाहिरातीत म्हणत आहेत, की तुमच्याकडे ७० मिनिटे आहेत, त्यानंतर happy hours तास नाहीत. याशिवाय कफ सिरप घेत असून संघातील खेळाडूंना बिअर वाया घालवू नये असा सल्लाही देत आहे. हा व्हिडिओ शेअर करत रवी शास्त्रींनी लिहिले की, मला यात काहीच आठवत नाही.
Don't remember any of this. pic.twitter.com/xDppHjE0iz
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) May 21, 2022
काही काळापूर्वी राहुल द्रविडचा अशीच एक जाहिरात आली होती, यात द्रविड इंदिरानगरचा गुंड बनला होता. राहुत द्रविडची स्टाइल लोकांनाही आवडली होती आणि यावेळी शास्त्रींनाही तेच प्रेम मिळत आहे. व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

