🕒 1 min read
मुंबई: आयपीएलच्या १५व्या हंगामातील मेगा ऑक्शनमध्ये अनेक मोठ्या आणि वेगवेगळ्या देशांतील खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. मात्र यात एका क्रीडा मंत्र्यांचेही नाव शामिल झाले आहे. इतिहासात पहिल्यांदाच एक मंत्री ऑक्शनचा भाग असणार आहे.
मेगा ऑक्शनमध्ये असणारा मंत्री पश्चिम बंगालचा क्रीडा मंत्री मनोज तिवारी आहे. तो पहिला सक्रिय नेता आहे, जो आयपीएल ऑक्शनमध्ये बोली लावण्यात येणार आहे. गेल्या 3 हंगामात एकाही संघाने निवडले नव्हते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मनोज तिवारी क्रीडा मंत्री आहे. त्याने आपली बेस प्राइस ५० लाख ठेवली आहे. त्याने शेवटचा सामना किंग्स इलेव्हन पंजाबकडून २०१८ मध्ये खेळाला होता. मात्र त्यानंतर त्याला कोणीही संघात घेतले नव्हते.
२०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मनोज तिवारीने अलीकडेच राजकीय क्षेत्रात आपली नवी इनिंग सुरू केली आहे. बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तो तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लढला आणि विजयी झाला. तो सध्या बॅनर्जी सरकारमध्ये क्रीडा आणि युवा राज्यमंत्रीपदाची मोठी जबाबदारी सांभाळत आहे. गेल्या महिन्यात बंगालच्या २१ जणांच्या रणजी संघातही त्याची निवड झाली होती. तिवारी शेवटचा सामना बंगालकडून मार्च २०२० मध्ये सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी फायनलमध्ये खेळला होता. यामुळे यंदा एक खेळाडू सोबत मंत्री पदावर असलेल्या मनोज तिवारीला कोणता संघ खरेदी करेल हे पाहणे रंजक असेल.
महत्वाच्या बातम्या
- ईएसआयसीच्या रूग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेसची तातडीने भरती करणार-राजेश टोपे
- ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांची सही; अजित पवारांची माहिती
- IPL 2022: श्रीशांत आणि अमित मिश्रा मेगा ऑक्शन मधील वयस्कर भारतीय खेळाडू
- कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर; प्रस्थापितांना धक्का
- “विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संघटना गंभीर नाहीत त्यामुळे…”, संदीप देशपांडेंची ‘हिंदुस्थानी भाऊ’ प्रकरणावर प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
