Share

IPL 2022 : मुंबई इंडियन्समध्ये येणार मराठी वाघ..! संघाला विजय मिळवून देण्यासाठी रोहितनं केली ‘त्या’ खेळाडूची मागणी!

Published On: 

मुंबई : रोहित शर्मा (Rohit Sharma)च्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये सलग सहा सामने गमावले आहेत. पाच वेळा चॅम्पियन मुंबईचा सामना गुरुवारी सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. मात्र, चेन्नईची स्थिती कमी-अधिक प्रमाणात मुंबईसारखीच आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी आता अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीचा लवकरच मुंबईच्या संघात समावेश केला जाऊ शकतो, असे वृत्त समोर आले आहे.

सध्याच्या मोसमात मुंबई इंडियन्सचे गोलंदाज विकेटसाठी आसुसलेले दिसत आहेत. धवल कुलकर्णी आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड ठरला. तो सध्या स्टार स्पोर्ट्सच्या कॉमेंट्री टीमचा एक भाग आहे. मुंबईच्या संघाने पहिले सहा सामने गमावले आहेत. ते अजूनही पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. मुंबई सध्या गुणतालिकेत तळाशी आहे. आणखी एक पराभव त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढू शकतो.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने धवल कुलकर्णीची मागणी केली आहे. धवल हा फक्त मुंबईकर आहे. अशा परिस्थितीत मुंबई आणि पुण्यात गोलंदाजी कशी करायची हे त्याला चांगलेच माहीत आहे. धवल कुलकर्णीने आयपीएलच्या ९२ सामन्यांत एकूण ८६ बळी घेतले आहेत. त्याने आयपीएल दरम्यान राजस्थान रॉयल्स, गुजरात लायन्स आणि मुंबईसाठी त्याने गोलंदाजी केली आहे. आयपीएलच्या १४व्या मोसमातही तो मुंबईचा भाग होता.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!