Share

IPL 2022 DC vs PBKS : ऋषभ पंतनं जिंकला टॉस; कोरोना झालेल्या मार्शच्या जागी ‘हा’ खेळाडू दिल्ली संघात!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धेत आज लीगचा ३२वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज (DC vs PBKS) यांच्यात रंगणार आहे. दिल्ली संघात कोरोनाची प्रकरणे आढळल्यानंतर हा सामना पुण्यातून मुंबईत हलवण्यात आला. ब्रेबॉर्नवर रंगणाऱ्या या सामन्यात दिल्लीचा कप्तान ऋषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मिचेल मार्श पॉझिटिव्ह असल्यामुळे सरफराज खानला दिल्ली संघात संधी मिळाली आहे.

पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आतापर्यंत एकूण २८ आयपीएल सामने झाले आहेत, त्यापैकी पंजाबने १५ सामने जिंकले आहेत आणि दिल्ली कॅपिटल्सने १३ सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या सध्याच्या फलंदाजांपैकी डेव्हिड वॉर्नरने पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक ९४५ धावा केल्या आहेत. पंजाब किंग्जच्या सध्याच्या फलंदाजांपैकी शिखर धवनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १५ सामन्यांमध्ये ५२२ धावा केल्या आहेत. अक्षर पटेलने दिल्ली कॅपिटल्सकडून पंजाब किंग्ज विरुद्ध ४ सामन्यात ५ विकेट घेतल्या. राहुल चहरने पंजाब किंग्जकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या ५ सामन्यात ५ बळी घेतले आहेत.

दोन्ही संघांची Playing 11

दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कप्तान/यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, ललित यादव, सरफराज खान, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद.

पंजाब किंग्ज – मयंक अग्रवाल (कप्तान), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, कगिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!