🕒 1 min read
मुंबई : रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. आता टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटची कमान त्याच्याकडे आली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. दरम्यान, रोहित आणि त्याची मुलगी समायरा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या तमाम चाहत्यांनाही तो खूप आवडला आहे. रोहितनेही त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून टीमच्या फोटोशूटचा व्हिडिओ शेअर केला आहे.
रोहितने मुंबई इंडियन्स संघासाठी फोटोशूट केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान तो त्याची मुलगी समायरासोबत डान्स करताना दिसला. याशिवाय संघातील इतर खेळाडूंनीही आपापले व्हिडिओ शेअर केले आहेत. मेगा लिलावात मुंबईने इशान किशनला १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. तो सध्याच्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू आहे. अशा स्थितीत त्यांच्यावर चांगली कामगिरी करण्याचे दडपण असेल.
https://www.instagram.com/p/CbZOikPDpW_/
२६ मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. मुंबईचा पहिला सामना २७ मार्चला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. क्विंटन डी कॉक, हार्दिक पंड्या, ट्रेंट बोल्ट असे मुंबईचे अनेक मोठे खेळाडू इतर संघात गेले आहेत. दुसरीकडे दिल्ली संघाची संपूर्ण जबाबदारी कर्णधार ऋषभ पंतवर असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
