मुंबई: काँग्रेससारखे पक्ष आजही परंपरांच्या शृंखलांत व जळमटात अडकून पडले आहेत . राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे भाजपशी वेगळय़ा पद्धतीने लढावे लागेल. ‘जी 23’ गटात असा कोणी लढवय्या असेल तर त्यांनी दंड थोपटून पुढे यायला हरकत नाह , पण ते शक्य आहे असे वाटत नाही. काँग्रेसने बेगडी निधर्मीवादाचा ‘हिजाब’ दूर करायला हवा, हे पहिले व परिणामांची पर्वा न करता बिनकामाच्या पुढाऱ्यांना बाजूला केले पाहिजे. पक्षाचे आणखी काय नुकसान व्हायचे राहिले आहे? काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बाबींत डोके खुपसायची गरज नाही, पण समस्त विरोधी पक्षांच्या अस्तित्वाचा आणि एकजुटीचा विषय असल्यानेच आम्ही आमची मते व्यक्त केली. असे मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी सामना अग्रलेखातून व्यक्त केले आहे.
काँग्रेसचे नेतृत्व यापुढेही गांधी परिवारच करत राहील यावर काँग्रेस कार्यसमितीत शिक्कामोर्तब झाले आहे . पाच राज्यांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पंजाबात सत्ता होती ते एकमेव राज्यही काँग्रेसने गमावल्यावर नेहमीप्रमाणे पक्षातील ‘जी 23’ गटाने उचल खाल्ली. कपिल सिब्बल यांनी तर स्पष्टच सांगितले ‘काँग्रेसबाहेरील व्यक्तीने आता काँग्रेसचे नेतृत्व करावे. ‘सिब्बल हे वकील आहेत व ते आपल्या अशिलाची बाजू चोखपणे मांडत असतात. या विषयात त्यांचा अशिल कोण व ते कोणाची बाजू मांडत आहेत? गांधींनी नेतृत्व सोडावे हे ठीक, पण काँग्रेसला पुढे घेऊन जाणारा, जिंकून देणारा नेता त्यांच्या ‘ जी 23’ गटात आहे काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
काँग्रेसच्या ताटातले आणि वाटीतले खाऊन-पिऊन अनेकदा ढेकर देऊन स्वस्थ झालेले नेते ‘जी 23’ मध्ये आहेत व काँग्रेस पराभवाचा ते विलाप करीत आहेत. यापैकी किती नेते पाच राज्यांतील निवडणुकांत जमिनीवर उतरले होते? किती जणांनी प्रत्यक्ष प्रचारात झोकून दिले होते? पी. चिदंबरम , केसी वेणुगोपाल , सचिन पायलट , भूपेश बघेल असे काही मोजके नेते दिसत होते. प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशात होत्या. राहुल गांधी गोवा, उत्तराखंड , पंजाबात होते , पण गुलाम नबी , कपिल सिब्बल व 23 कॅरेटचे नेते या रणधुमाळीत कधी दिसले नाहीत. हे सर्व नेते बाहेर राहून गांधी परिवाराची तारांबळ ‘ एन्जॉय ‘ करीत होते व मनोमन काँग्रेसच्या अपयशाची मनोकामना करीत होते असेच वाटते. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
त्यामुळे झाडाची पूर्ण छाटणी करून नव्याने बगिचा फुलवावा लागेल. भाजपच्या यशाचा डोलारा कृत्रिम आहे. कृत्रिम झाडे , कृत्रिम पाऊस , कृत्रिम गवत असा सर्व आधार आहे. ‘ हिजाब’सारखी प्रकरणे उकरून काढणे, ‘कश्मीर फाईल्स’चा चित्रपटातून ‘ प्रपोगंडा’ करणे असे प्रकार काँग्रेस किंवा अन्य पक्षांना आता जमायला हवेत. कश्मिरी पंडितांच्या पलायनामागचे सत्य वेगळेच आहे. केंद्रात भाजप पाठिंब्याचे व्ही . पी . सिंग सरकार होते व कश्मीरात भाजपचे प्रिय जगमोहन हे राज्यपाल असताना पंडितांना पलायन करावे लागले, हे सत्य समोर आणण्यात भाजपविरोधक तोकडे पडत आहेत. काँग्रेससारखे पक्ष आजही परंपरांच्या शृंखलांत व जळमटात अडकून पडले आहेत. पक्षाचे आणखी काय नुकसान व्हायचे राहिले आहे? काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बाबींत डोके खुपसायची गरज नाही, पण समस्त विरोधी पक्षांच्या अस्तित्वाचा आणि एकजुटीचा विषय असल्यानेच आम्ही आमची मते व्यक्त केली. असे संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022: अजित आगरकरचा ‘या’ आयपीएल फ्रँचाइसीबाबत खुलासा; म्हणाला “सगळे त्यांच्यावर हसत…”
- ‘तेव्हा आम्ही बघूच की कोण आयपीएल खेळायला जातो’ ; पीएसएलमध्ये मोठा बदल आणण्याचे रमीज राजांचे संकेत
- IPL 2022: सुरेश रैना आयपीएलमध्ये परतणार; यंदा मात्र एका नवीन रूपात!
- जळगावात विद्यार्थिनीने दिला रोड रोमिओला चोप; व्हिडिओ व्हायरल
- कवी कुमार विश्वासची ‘काश्मीर फाइल्स’वर जळजळीत प्रतिक्रिया


