मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामातून चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा माघार घेण्याच्या तयारीत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्धच्या लढतीत जडेजाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण, अशात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) फ्रेंचायझी व जडेजा यांच्यात मतभेद झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे आणि त्यामागे कारणही तसेच आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK)ने रवींद्र जडेजाला इंस्टाग्राम अकाऊंटवरून अनफॉलो केले आहे. त्यामुळे चेन्नई व जडेजा यांच्यात वाद असल्याचे बोलले जात आहे.
या हंगामाच्या सुरुवातीला रवींद्र जडेजा चेन्नई संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघाची सुरुवात चांगली झाली नाही. चेन्नईला पहिल्या चार सामन्यात पराभव पत्करावा लागला. यानंतर बंगळुरूविरुद्ध त्याने विजयाचे खाते उघडले, पण संघाला सलग विजय मिळवता आला नाही. त्यामुळे रवींद्र जडेजाने ३०मेच्या संध्याकाळी महेंद्रसिंह धोनीकडे पुन्हा कर्णधारपद सोपवले. फलंदाजी आणि गोलंदाजीतही जडेजाने निराशा केली. कर्णधारपदाचे दडपण जडेजाच्या कामगिरीवरही जाणवले आणि त्याला १० सामन्यांत केवळ ११६ धावा व ५ विकेट्स अशी कामगिरी करता आली आहे. त्यामुळेच पुन्हा धोनीकडे नेतृत्व सोपवण्यात आले.
https://twitter.com/ValimaiKomban/status/1523585535910227968?t=Uue6Uix5MF50cym4QPuYpw&s=19
CSK unfollowed @imjadeja
First, they removed him from the captaincy, then benched him last match and now this. We have seen similar things last year with Warner pic.twitter.com/jZ0erY5nQL— Aayush Shetty (@bebaslachara_) May 9, 2022
अश्यातच आता सोशल मीडियावर चेन्नईने रवींद्र जडेजाला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केल्याचा दावा केला जात आहे. त्यावरून विविध तर्क लावले जात आहेत. सोशल मीडियावर नेटकरी चेन्नईने अनफॉलो केल्याचे स्क्रीनशॉट शेअर करत आहेत. विविध प्रसारमाध्यमांवर याबाबत बातम्या प्रकाशित केल्या जात आहेत.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

