मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा हंगाम निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. आज १५व्या मोसमातील पहिला क्वालिफायर सामना (Qualifier 1)गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात होणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर उभय संघांमधील सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. पण हा सामना कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांवर पाऊस किंवा वादळाचा परिणाम झालेला नाही. गुजरात आणि राजस्थान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पावसाची शक्यता आहे. जर हा सामना पावसामुळे झाला नाही तर कोणता संघ सामना जिंकेल? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील क्वालिफायर सामना पावसामुळे न झाल्यास आयपीएलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निकाल मिळविण्यासाठी ५-५ षटकांचा सामना खेळवला जाईल. जर असाही सामना शक्य नसेल तर सुपर ओव्हर होईल. जर हवामानाने सुपर ओव्हरलाही परवानगी दिली नाही, तर दोन्ही संघांमधून गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल. या जोरावर गुजरात टायटन्सचा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. कारण गुणतालिकेत गुजरात अव्वल आहे आणि त्याची स्थिती राजस्थान रॉयल्सपेक्षा सरस आहे. आयपीएल प्लेऑफ सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नाही.
⚔️ KEY BATTLE! Shimron Hetmyer has fared well against Lockie in the past. Can he do the same tonight in the qualifier?
???? IPL • #GTvRR #RRvGT #IPL #IPL2022 #TATAIPL #BharatArmy pic.twitter.com/J9gC92Ov1P
— The Bharat Army (@thebharatarmy) May 24, 2022
नियमांनुसार राजस्थान रॉयल्सचा संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झाला तर त्याला दुसऱ्या प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळेल. अशा स्थितीत संघाचा सामना एलिमिनेटर सामन्यातील विजेत्याशी होईल. आयपीएल २०२२चा एलिमिनेटर सामना २५ मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. हा सामना कोलकातामध्येही होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाशी राजस्थान रॉयल्सची स्पर्धा होईल. हा सामनाही पावसाने वाहून गेला तर लखनऊ सुपर जायंट्सचा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

