Share

IPL 2022 PBKS vs RR : पंजाब किंग्जनं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज शनिवारी दोन सामने होणार आहेत. दिवसाचा पहिला सामना म्हणजेच स्पर्धेचा ५२वा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (PBKS vs RR) यांच्यात होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात पंजाबचा कप्तान मयंक अग्रवालने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा संघ दहापैकी पाच सामने जिंकून सातव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थानचा संघ दहापैकी सहा सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे. उभय संघांमधील हंगामातील हा पहिला सामना आहे.

पंजाब किंग्जने त्यांच्या मागील सामन्यात जबरदस्त खेळ दाखवत गुजरात टायटन्सविरुद्ध मोठा विजय नोंदवला. शिखर धवन, भानुका राजपक्षे आणि लियाम लिव्हिंगस्टोन हे त्रिकूट विरोधी गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकते. गोलंदाजीत कगिसो रबाडा सातत्याने विकेट घेत आहे, तर अर्शदीप सिंग कठीण काळात धावगती रोखण्याचे उत्तम काम करत आहे.

राजस्थान रॉयल्सने त्यांचे मागील दोन सामने गमावले आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचे दोन स्टार परफॉर्मर्स युझवेंद्र चहल आणि जोस बटलर यांना त्यांच्या यशाची पुनरावृत्ती करण्यात आलेले अपयश. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण २३ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये पंजाबने १० आणि राजस्थानने १३ सामने जिंकले आहेत.

दोन्ही संघांची Playing 11

पंजाब किंग्ज – जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, मयंक अग्रवाल (कप्तान), भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा.

राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), यशस्वी जयस्वाल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!