Share

IPL 2022 PBKS vs RR : जॉनी-जितेशची सुंदर खेळी..! पंजाबचं राजस्थानला १९० धावांचं आव्हान

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज डबल हेडरचा पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (PBKS vs RR) यांच्यात होत आहे. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात पंजाबने राजस्थानला १९० धावांचे आव्हान दिले आहे. पंजाबचा कप्तान मयंक अग्रवालने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज जॉनी बेअरस्टोने अर्धशतक ठोकले तर जितेश शर्माने फिनिशरची भूमिका बजावली. पंजाबचा संघ दहापैकी पाच सामने जिंकून सातव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थानचा संघ दहापैकी सहा सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे. उभय संघांमधील हंगामातील हा पहिला सामना आहे.

पंजाबचा डाव

पंजाबने खराब फॉर्मात असलेल्या जॉनी बेअरस्टोला आज पुन्हा संधी देत शिखर धवनसोबत सलामीला पाठवले. त्यानेही संधीचे सोने करत फटकेबाजी केली. धवनला (१२) लवकर तंबूत पाठवण्यात रवीचंद्रन अश्विन यशस्वी ठरला. जोस बटलरने धवनचा एकहाती जबरदस्त झेल घेतला. भानुका राजपक्षेने बेअरस्टोसोबत धावा केल्या. त्याने २ चौकार आणि २ षटकारांसह २७ धावा केल्या. अर्धशतक ठोकलेल्या बेअरस्टो आणि कप्तान मयंक अग्रवालला (१५) फिरकीपटू युझवेंद्र चहलने १५व्या षटकात बाद केले. जितेश शर्मा आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी शेवटच्या षटकात फटकेबाजी करत अर्धशतकी भागीदारी रचली. १९व्या षटकात प्रसिध कृष्णाने लिव्हिंगस्टोनला (२२) क्लीन बोल्ड केले. २०व्या षटकात जितेशच्या फटकेबाजीमुळे पंजाबने १६ धावा ठोकल्या. जितेशने १८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३८ धावा केल्या. २० षटकात पंजाबने ५ बाद १८९ धावा केल्या. चहलने ३ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11

पंजाब किंग्ज – जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, मयंक अग्रवाल (कप्तान), भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा.

राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), यशस्वी जयस्वाल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!