राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांवर निशाणा साधला आहे. पक्ष स्थापनेआधी मराठी म्हणून उत्तर प्रदेशच्या कानफटीत मारायची, नंतर भोंगा आणि आता झाला ठेंगा असं म्हणत गुलाबराव पाटलांनी टीका केली. ते शनिवारी (७ मे ) जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
राज ठाकरेंनी हिंदूत्वाची भूमिका स्वीकारली आहे. त्यांनी त्यांच्या पक्षा झेंडा देखील बदलला आहे. राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत. आहे. यापूर्वी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी होत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

