मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये, आज पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज (PBKS vs CSK) यांच्यात स्पर्धेचा ३८वा सामना खेळला जात आहे. वानखेडेवर रंगणाऱ्या या सामन्यात चेन्नईचा कप्तान रवींद्र जडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर शिखर धवनच्या ८८ धावांच्या खेळीसह पंजाबने चेन्नईला १८८ धावांचे आव्हान दिले आहे. चालू मोसमातील उभय संघांमधील हा दुसरा सामना आहे. पंजाब किंग्जने आतापर्यंत सातपैकी तीन सामने जिंकले असून सहा गुणांसह ते आठव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जने सातपैकी फक्त दोन सामने जिंकले असून चार गुणांसह ते नवव्या स्थानावर आहे.
पंजाबचा डाव
कप्तान मयंक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी पंजाबच्या डावाची संयमी सुरुवात केली. पहिल्या गड्यासाठी ३७ धावा केल्यानंतर पंजाबने एका फलंदाजाला गमावले. चेन्नईला महीश तिक्षणाने पहिले यश मयंकच्या (१८) रुपात मिळवून दिले. त्यानंतर भानुका राजपक्षे आणि धवनने शतकी भागीदारी रचली. या सामन्यात धवनने आयपीएलमधील ६००० धावांचा टप्पा ओलांडला. १८व्या षटकात भानुका माघारी परतला. त्याने २ चौकार आणि २ षटकारांसह ४२ धावा केल्या. १९व्या षटकात लियाम लिव्हिंगस्टोन आणि धवनने २२ धावा चोपल्या. लिव्हिंगस्टोन शेवटच्या षटकात बाद झाला. त्याने ७ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह १९ धावा केल्या. ब्राव्होने टाकलेल्या या षटकात पंजाबला १२ धावा मिळाल्या. २० षटकात पंजाबने ४ बाद १८७ धावा केल्या. धवनने ९ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ८८ धावांची खेळी केली. चेन्नईकडून ब्राव्होने सर्वाधिक २ बळी घेतले.
Innings Break!
An 88* from Shikhar Dhawan and well supported by Bhanuka Rajapaksa (42) propels #PBKS to a total of 187/4 on the board.
Scorecard – https://t.co/V5jQHQZNn0 #PBKSvCSK #TATAIPL pic.twitter.com/oJ1297kek7
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2022
दोन्ही संघांची Playing 11
पंजाब किंग्ज – मयंक अग्रवाल (कप्तान), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), भानुका राजपक्षे, ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चहर, संदीप शर्मा, अर्शदीप सिंग.
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कप्तान), महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी, महीश तिक्षणा.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

