Share

IPL 2022 : राणा – रसेलच्या खेळीने कोलकाता सुसाट! सनरायझर्सपुढे १७६ धावांचे लक्ष्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्या सनरायझर्स हैदराबादचा (KKR vs SRH) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामन्यात नाणेफेक जिंकत विल्यमसनच्या (kane williamson) नेतृत्वात हैदराबाद प्रथम गोलंदाजी निवडली. ज्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने हैदराबादपुढे १७६ धावांचे बलाढ्य लक्ष्य ठेवले आहे.

नाणेफेक गमवल्यानंतर अय्यरचे (Shreyas iyer) नाईट रायडर्स प्रथम फलंदाजीस उतरले. सामन्याच्या सुरुवातीलाच कोलकात्याचे दोन्ही सलामीवीर १० धावाही न करता माघारी परतले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या कर्णधार श्रेयसने केकेआरला सावरायला सुरुवात केली. सुनील नरेन (sunil narine) ६ धावा करून बाद झाल्यानंतर नितीश राणाने (nitish rana) श्रेयसला साथ दिली. ज्यात त्याने ५८ धावांचे शानदार अर्धशतक केले. एका बाजूला विकेट पडत असताना राणाने मात्र आपला खेळ सुरूच ठेवला.

दीडशेच्या आत केकेआर संपणार तोच आंद्रे रसेलने (andre russell आपल्या पॉवर हीटिंगने पुन्हा एकदा मैदान मारले. त्याने अवघ्या २५ चेंडूत धमाकेदार ४६ धावा करत कोलकात्याला १७५ धावांपर्यंत पोहचवले. दुसरीकडे हैदराबादकडून टी नटराजनने ३ विकेट्स पटकावल्या. तर सुपर फास्ट एक्प्रेस उमरान मलिकने २ विकेट्स घेतल्या.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!