Share

IPL 2022: आता काय करणार धोनी? स्पर्धेला दोन दिवस शिल्लक असताना समोर आली चिंताजनक बातमी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली चेन्नई सुपर किंग्ज सोबत आयपीएलच्या सलामीच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. अली, ज्याला सीएसकेने ८ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते, तो आगामी आयपीएल हंगामासाठी संघात अजूनही सामील झालेला नाही. आयपीएलसाठी भारतात जाण्यासाठी आवश्यक असलेला व्हिसा मिळवण्यात अयशस्वी झाल्याने मोईन अली यूकेमध्ये अडकला आहे.

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई (CSK vs KKR) संघाचा पहिला सामना खेळण्याची संधी मिळविण्यासाठी मोईनला बुधवारपर्यंत मुंबईत येणे आवश्यक आहे. भारतात आल्यावर, मोईनला (Moeen ali) आयपीएल बायो बबलमध्ये प्रवेश करण्यासाठी तीन दिवस अनिवार्य क्वारंटाईनमधून जावे लागेल. त्यामुळे, सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाने हे मान्य केले आहे की तो सलामीचा सामना खेळण्याची शक्यता कमी आहे.

गेल्या वर्षी एमएस धोनीच्या (MS Dhoni) संघाने चौथे आयपीएल विजेतेपद पटकावण्यात मोईनची महत्त्वाची भूमिका होती. २०२१ मध्ये सुपर किंग्ससाठी २५.५० च्या सरासरीने आणि १३७. ३० च्या स्ट्राइक रेटने ३५७ धावा ठोकत तो सुपर किंग्ससाठी तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. यामुळे धोनी मोठा अडचणीत सापडला आहे. मोईन अष्टपैलूची भूमिका देखील साकारत असल्याने त्याच्या जागी कोण खेळेल हा प्रश्न चेन्नई समोर उभा राहिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!