Share

IPL 2022 MI vs DC : खुलासा..! मॅचपूर्वी टिम डेव्हिडला आला होता डु प्लेसिसचा मेसेज; त्यात होता ‘असा’ PHOTO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये प्लेऑफ खेळण्यासाठी चार संघ निश्चित झाले आहेत. शनिवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा ५ गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर दिल्लीचे प्लेऑफ खेळण्याचे स्वप्न भंगले, तर त्यांच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सलग तिसऱ्यांदा प्लेऑफसाठी पात्र ठरला. वानखेडे स्टेडियमवर १६० धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला शेवटच्या ३१ चेंडूत ६५ धावांची गरज होती. यानंतर टिम डेव्हिडने सामना पूर्णपणे बदलला. डेव्हिडने अवघ्या ११ चेंडूत ३४ धावांची धडाकेबाज खेळी केली.

डेव्हिडने सामन्यानंतर खुलासा केला, की या सामन्यापूर्वी आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने त्याला सकाळीच मेसेज केला होता. तो म्हणाला, ”आज सकाळी फाफने मला मेसेजही केला होता. ज्यामध्ये विराट, मॅक्सवेल आणि फाफ यांनी मुंबई इंडियन्सचे टी-शर्ट घातले होते. विजयासह समाप्त करणे चांगले वाटते. चांगली भावना आहे. विजयासह पूर्ण करण्यापेक्षा आम्ही काहीही मागू शकत नाही. इशान आऊट होताच त्याने मला सांगितले, की विकेट सपाट आणि संथ झाली आहे, चेंडू उशिराने बॅटवर येत आहेत.”

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने टिम डेव्हिडविरुद्ध झेलच्या अपीलसाठी डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला असता, तर निकाल वेगळा लागला असता, कारण मुंबईकडे तेवढी फलंदाजी उरलेली नव्हती. दिल्लीच्या पराभवाचे हेही एक प्रमुख कारण होते.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!