Share

“अयोध्याबाबतच्या प्रतिक्रिया ट्रॅप होता-सापळा होता, मला अडकायचं नव्हतं”; राज ठाकरेंच स्पष्टीकरण

Published On: 

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडवा सभेनंतर आता पुण्यात चौथी सभा आज रविवार सकाळी १० वाजता पुण्यात सभा होत आहे. मुंबईत गुढीपाडवासभेनंतर राज ठाकरे यांची ठाणे आणि औरंगाबाबत येथे सभा झाली. परंतु आज पुण्यात होणाऱ्या सभेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. राज ठाकरे यांनी पाच जूनला अयोध्या दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते, पण यानंतर उत्तर प्रदेशमधून भाजप खासदार बृजभूषण सिंग यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेश मध्ये राज ठाकरे यांना पाय ही ठेवू देणार नाही, म्हणत जोरदार विरोध केला. यानंतर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्याचे जाहीर केले. आता अयोध्या दौऱ्यावर राज ठाकरे यांनी आता आपल्या सभेतून उत्तर दिले आहे.

अयोध्या दौऱ्याबाबत येणाऱ्या प्रतिक्रिया म्हणजे एक ट्रॅप होता – सापळा होता, मला त्याच्यामध्ये अडकायचं नव्हतं, असे राज ठाकरे म्हणाले. अयोध्या दौरा रद्द करण्याच्या सापळ्याची राज्यातूनच झाली आहे. आपल्या महाराष्ट्र सैनिकांच्या अंगावर केसेस नकोत म्हणून अयोध्या दौरा रद्द केला आहे. आज माफी मागायला सांगत आहे. गुजरातमध्ये कुणाला माफी मागायला लावणार आहात? हे अचानक आत्ता कसं सुरू झालं? ज्यांना आपलं हिंदुत्व, लाऊडस्पीकर झोंबले, आपल्याविरोधात सगळे एकत्र येतात. अन्यथा भांडत असतात, राज ठाकरे म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे, मला कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व म्हणतायेत, वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीजसे सफेद कैसे? प्रश्न रिझल्ट्सचा आहे. जे आम्ही देतो,” असे ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!