🕒 1 min read
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात आज २२ मे रोजी (रविवारी) सभा होत आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधत चांगलाच टोला लगावला. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना केमिकल लोचा असलेला मुन्नाभाई म्हणून डिवचले होते. तर आज राज ठाकरे यांनी सभेत प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे मला कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीजसे सफेद कैसे? प्रश्न रिझल्ट्सचा आहे. जे आम्ही देतो. जे आत्ता उत्तर प्रदेश, बिहारचं बोलतायत. आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीसाठी तिथून हजारो लोक महाराष्ट्रात रेल्वे स्टेशनवर आले. आपले लोक त्यांच्याशी बोलायला गेले होते. तिथे बोलता बोलता त्या बाचाबाचीत तिथल्या एका मुलाने आपल्या एका पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली. आणि जे सगळं प्रकरण सुरू झालं.ते तिथून झालं. पण महाराष्ट्रात रेल्वे भरती होती याच्या जाहिराती महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रात कुठेही नाही. पण त्याच्या जाहिराती उत्तर प्रदेश, बिहारच्या वर्तमानपत्रात येत होत्या. तिथल्या रेल्वेभरतीमध्ये तिथल्या मुलांना नोकऱ्या मिळायला हव्यात. महाराष्ट्रातल्या भरतीमध्ये इथल्या मुलांना नोकऱ्या मिळायला हव्यात. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्यानंतर स्थानिक भाषांमध्ये परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला. हे त्या आंदोलनाचं यश आहे. असा उल्लेख राज ठाकरे यांनी केला.
मला एक आंदोलन दाखवा जे अर्धवट सोडलं. टोलनाक्याच्या आंदोलनानंतर ७० टोलनाके महाराष्ट्रातले बंद झाले. बाकीच्या पक्षांची काहीच जबाबदारी नाही का? मुंबईत बॉलिवुडमध्ये पाकिस्तानी कलाकार येत होते. या देशातून हाकलून दिलं त्यांना. कुठे होते त्यावेळी हिंदुत्वाची पकपक करणारे? जेव्हा रझा अकादमीच्या लोकांनी मोर्चा काढला आणि पोलीस भगिनींना घोळका करून त्यांच्या अब्रूवर हात घालण्यात आला. बाहेरचे मुसलमान तिथे आले होते. त्याच्याविरोधात फक्त मनसेनं मोर्चा काढला. बाकी कुणी नाही काढला. कोणतं हिंदुत्व बोलताय तुम्ही? उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट सांगावी की तुमच्या अंगावर एका तरी आंदोलनाची केस आहे का? भूमिकाच कुठली घ्यायची नाही. असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “जिथे माझे कारसेवक मारले गेले त्यांचे..”, राज ठाकरेंनी सांगितले अयोध्या दौऱ्यामागील कारण
- “मटणकरी नाही, तो तर थ्री इडियट्स मधला सायलेन्सर”, ‘मनसे’चा अमोल मिटकरींवर निशाणा
- “उद्धव ठाकरेंमध्ये नाही तर राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब दिसतात” – गजानन काळे
- अजित दादाने भाजपसोबत छय्या छय्या केले, तुम्ही फोने बंद करून ठेवले; मनसेचा धनंजय मुंडेंना टोला
- “गॅस सिलेंडर कमरेला बांधा, डिझेल-पेट्रोल काखेत घ्या…”, सदाभाऊंचा महाविकास आघाडीवर निशाणा

