🕒 1 min read
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुण्यातील सभेला सुरुवात झाली आहे. दरम्यान सभेपूर्वी मनसे नेते गजानन काळे यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे. गजानन काळे म्हणाले, अजित दादाने भाजपसोबत छय्या छय्या केले, तुम्ही फोन बंद करून ठेवले असा टोमणा यावेळी त्यांनी धनंजय मुंढेना मारला. आता राज ठाकरे मंचावर हजर झाले आहेत. राज ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली आहे. यावेळी बोलताना सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
मागील विधान सभा निवडणुकीत राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडत होता. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांना सभा रद्द कराव्या लागल्या. शरद पवार यांनी त्यावेळी साताऱ्यात आपण इतर नेत्यांपेक्षा वेगळे का आहोत, हे दाखवून दिले. सातारा लोकसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, याठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. त्यावेळी शरद पवार यांनी कोणतीही पर्वा न करता मुसळधार पावसात भाषण ठोकले होते. या पाश्वर्भूमीवर राज ठाकरे यांनी आज “निवडणूका नाहीत उगाच भाषण भिजत कशाला असे म्हणत शरद पवार यांना जोरदार टोला लगावला”.
वसंत मोरेंकडून काही मनसे नेत्यांवर नाराजी, म्हणाले…
राज ठाकरेंच्या सभेच्या आदल्या दिवशी वसंत मोरेंयांनी काही मनसे नेत्यांवर नाराजी व्यक्त करत गौप्यस्फोट केला आहे. वसंत मोरे म्हणाले, “मला सारखं का सांगावं लागतंय की मी मनसेत आहे. कोण यामागे आहे. कुणीतरी या सगळ्या गोष्टी घडवून आणतंय. मला जाणून बुजून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी राज ठाकरेंसमोर या गोष्टी मांडणार आहे. या गोष्टी राज ठाकरेंपर्यंत गेल्याच नसतील. त्यांना इथे काय चाललंय ते माहितीच नसेल. मी याबाबत पुण्यातील पक्षाच्या नेत्यांच्या कानावर गोष्टी घालतोय. गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून मला सांगायला लागतंय की मी मनसेत आहे. कोण पक्षातून कुणाला बाहेर घालवायला बघतंय त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजेत”.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
