Share

IPL 2022 MI vs DC : जसा गुरू तसा शिष्य..! बुमराहनं साधली मलिंगाच्या खास पराक्रमाची बरोबरी; नक्की वाचा!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ६९वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने दिल्लीचा ५ गडी राखून पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करत ३ बळी घेतले. यादरम्यान बुमराहने लसिथ मलिंगाच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली. या सामन्यात दिल्लीने ७ बाद १५९ धावा केल्या, त्यानंतर मुंबई इंडियन्सने ५ चेंडू बाकी असताना लक्ष्य गाठले.

जसप्रीत बुमराह हा आता आयपीएलच्या इतिहासात १९ वेळा एका सामन्यात ३ बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगाने १९ वेळा आयपीएलमध्ये ३ विकेट घेतल्या होत्या. बुमराह आणि मलिंगा व्यतिरिक्त आयपीएलमध्ये ३ बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अमित मिश्राने १७ वेळा आणि ड्वेन ब्राव्होने १६ वेळा हा करिष्मा केला आहे. याशिवाय उमेश यादवने १६ वेळा आयपीएलमध्ये ३ विकेट्स घेतल्या आहेत.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. यादरम्यान जसप्रीत बुमराहने दिल्लीला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. बुमराहने चांगली गोलंदाजी केली. त्याने सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्शची विकेट घेतल्या. याशिवाय बुमराहने धोकादायक फलंदाज रोवमन पॉवेललाही तंबूत धाडले. त्याने आपल्या कोट्यातील ४ षटकात २५ धावा देत ३ बळी घेतले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!