🕒 1 min read
पुणे : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी २३ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. या पाश्वर्भूमीवर आज पुण्यातील जाहीर सभेत राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याला जोरदार टोला लगावला. राज ठाकरेंची ही सभा पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित केली होती.
आज पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “गुजरातमध्ये कुणाला माफी मागायला लावणार आहात? हे अचानक आत्ता कसं सुरू झालं? ज्यांना आपलं हिंदुत्व, लाऊडस्पीकर झोंबले, आपल्याविरोधात सगळे एकत्र येतात. अन्यथा भांडत असतात. मी म्हटलं जर मशिदीवर बांग जोरात लागली तर त्याच्यासमोर हनुमान चालीसा लावा. हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणायला गेले. ती काय मशीद आहे का? असा सवाल उपस्थितीत करत राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याला टोला लगावला आहे.
हनुमान चालीसा प्रकरण –
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या भूमिकेला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी समर्थन केले होते. त्यानंतर राणा दांपत्यानी २३ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यापूर्वीच शिवसैनिकांनी राणा दांपत्याच्या घराबाहेर जाम ठोकला होता, हनुमान चालीसा पठन प्रकरणी राणा दाम्पत्याला अटकही करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
