Share

“एमआयएमची औलाद येते आणि औरंगजेबाच्या पाया पडते” ; राज ठाकरे संतापले

Published On: 

🕒 1 min read

पुणे :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडवा सभेनंतर आता पुण्यात चौथी सभा आज रविवार सकाळी १० वाजता पुण्यात सभा पार पडली. मुंबईत गुढीपाडवासभेनंतर राज ठाकरे यांची ठाणे आणि औरंगाबाबत येथे सभा झाली. राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्याचे जाहीर केले. आता या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पुण्यातल्या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी ओवेसी यांच्या औरंगजेब कबर भेटीवर जोरदार समाचार घेतला.

शिवसेनेच एमआयएमला औरंगाबाद मध्ये वाढवलं, मोठा केला. या निजामाच्या औलादी इकडे वळवळ करू लागल्या, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. शिवसेनेचा औरंगाबादचा खासदार पडला आणि एमआयएम चा निवडून आला. एमआयएमला भुसभुशीत जमीन शिवसेनेच दिली. आमच्याच महाराष्ट्रात निजामाची औलाद येते. जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्याच्या मनसुब्याने निघाला अश्या औरंगजेबाच्या कबरीवर ते ओवेसी डोकं टेकवतात. मात्र सरकार काहीच कारवाई करत नाही. आम्हालाच लाज वाटत नाही. सत्ताधारीच असे बसले आहेत. आता आमच्या शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल, तर यापलीकडे काय बोलायचं? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांनी यावेळी अयोध्या दौऱ्यावरही आपली भूमिका मांडली. राजकारणात भावना अनेकांना समजत नसतात. पण ज्या प्रकारचा माहौल तिथे उभा केला जात होता, मी उद्या जर तिथे जायचं ठरवलंच असतं, तर महाराष्ट्रातून अनेक बांधव तिथे आले असते. तिथे जर काही झालं असतं, तर आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या, जेलमध्ये सडवलं गेलं असतं आणि हकनाक काही कारण नसताना तो ससेमिरा तुमच्या पाठिशी लावला असता. मी आपली पोरं हकनाक घालवणार नाही. या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर देखील केसेस टाकल्या असत्या आणि ऐन निवडणुकीच्या वेळी इथे कुणीच नसतं. हा सगळा सापळा होता. असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!