Share

Wimbledon 2022 : डॅनिल मेदवेदेवसह रशिया, बेलारुसच्या खेळाडूंना केलं स्पर्धेबाहेर! ‘हे’ आहे कारण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा टेनिसपटू रशियाचा डॅनिल मेदवेदेव (Daniil Medvedev), जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकाचा खेळाडू आंद्रे रुबलेव्ह आणि महिलांमध्ये जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असणारी बेलारूसची आर्यन सबालेंका जगातील प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम विम्बल्डन (Wimbledon 2022) स्पर्धेला मुकणार आहेत. युक्रेनवर रशियाने (Russian Ukrainian War) केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विम्बल्डनचे आयोजक ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबने २७ जून ते १० जुलै या कालावधीत होणाऱ्या ग्रँडस्लॅममधून रशिया आणि बेलारूसच्या टेनिसपटूंवर बंदी घातली आहे. आयोजकांनी हा निर्णय घेतला असून ते ते जाहीर करणार आहेत, असा दावा ब्रिटीश माध्यमांनी केला आहे. मेदवेदेवनेही नोव्हाक जोकोविचच्या जागी तीन आठवडे या वर्षी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

सबालेंकाने गेल्या वर्षी या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती, तर मेदवेदेवने चौथ्या फेरीत प्रवेश केला होता. मेदवेदेव आणि सबालेंका हे यंदाचे विम्बल्डन जिंकण्याचे दावेदार मानले जात होते. रशियन आणि बेलारशियन खेळाडूंना त्यांच्या देशाच्या ध्वजशिवाय टेनिस स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली असली तरी, आयोजकांनी या महिन्याच्या सुरुवातीला स्पष्ट केले की ते या देशांतील खेळाडूंविरुद्ध मोठी पावले उचलली जाणार आहेत.

या निर्णयाचा परिणाम केवळ मेदवेदेव आणि सबालेंका यांच्यावरच होणार नाही, तर रशियाच्या जागतिक क्रमवारीत १५व्या क्रमांकावर असलेली अनास्तासिया पावल्युशेन्कोवा १८व्या क्रमांकावर असलेली व्हिक्टोरिया अझारेंका (महिला), जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर आंद्रे रुबलेव्ह (महिला), कारेन खाचानोव (पुरुष) हे खेळाड़ूदेखील खेळू शकणा नाहीत. सध्या रशियाचे टॉप ४० मध्ये आठ खेळाडू आहेत. मात्र, पुढील महिन्यात पॅरिसमध्ये सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये रशियन आणि बेलारशियन खेळाडू खेळणार आहेत.

आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने (ITF) रशियात होणाऱ्या स्पर्धाही रद्द केल्या आहेत. टेनिस व्यतिरिक्त रशियाच्या खेळाडूंना फुटबॉल, रग्बी, फॉर्म्युला वन, सायकलिंग, रोइंग स्पर्धांमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. जागतिक तायक्वांदोकडून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मानद ब्लॅक बेल्ट काढून घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!