मुंबई : लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आज आयपीएलमध्ये आमनेसामने येणार आहेत. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे. त्यांच्या शेवटच्या सामन्यात लखनऊने सनरायझर्स हैदराबादचा १२ धावांनी पराभव केला. तर गेल्या सामन्यात दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला होता. आयपीएलमध्ये सलग दोन विजय मिळविल्यानंतर लखनऊच्या नजरा आता फक्त विजयाकडे असतील.
आयपीएलच्या या मोसमात लखनऊच्या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले असून दोन वेळा विजय मिळवले आहेत. गेल्या सामन्यात लखनऊ संघाची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. लखनऊने अटीतटीच्या सामन्यात हैदराबादचा पराभव केला. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता संघाचे सर्व खेळाडू आज शानदार सामना खेळून विजयाची हॅट्ट्रिक नोंदवण्याचा प्रयत्न करतील.
तर दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत फक्त दोन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात दिल्लीने बाजी मारली होती, तर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून त्यांना १४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
लखनऊ सुपरजायंट्स –
केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, एविन लुईस, मनीष पांडे, क्विंटन डी कॉक, रवी विश्नोई, दुष्मंता चमिरा, शाहबाज नदीम, मोहसीन खान, मयंक यादव, अंकित राजपूत, आवेश खान, अँड्र्यू टाय, मार्कस स्टॉइनिस, काइल मायर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बडोनी, दीपक हुडा, कृणाल पंड्या, जेसन होल्डर.
दिल्ली कॅपिटल्स –
ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, ललित यादव, रोवमन पॉवेल, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, मुस्तफिजुर रहमान.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : “माझ्यासाठी धोनीला माहीभाई म्हणणं अवघड होतं”, चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूचा खुलासा!
- परवानगी मिळाली नाही तर रस्त्यावरच टेबल टाकून राज ठाकरे यांची सभा घेणार – बाळा नांदगावकर
- IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीच्या ‘या’ जाहिरातीवर बंदी..! काय आहे कारण? जाणून घ्या
- “मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है” म्हणत शालिनी ठाकरेंचा सुजात आंबेडकरांवर हल्लाबोल
- IPL 2022 : “चेंडू हवेत तरंगत होते…”, पॅट कमिन्सला आपल्या विक्रमी खेळीवर विश्वास बसेना; वाचा काय म्हणाला तो!
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

