🕒 1 min read
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सध्या किणी प्रकरणावरून निशाणा साधला जात आहे. यंदाच्या पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी भाजपचे कौतुक करत अनेक मोठे खुलासे केले. मात्र सत्ताधारी पक्षाकडून त्यांना ‘किणी फाईल’ वरून टार्गेट केले जात आहे. तसेच राज ठाकरे यांची बदलती भूमिका बद्दलही त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका करणाऱ्या राज्यातील सत्ताधाऱ्यांचे ढोंग उघडकीस आणून त्यांना सणसणीत आणि खणखणीत ‘उत्तर’ देण्यासाठी राज ठाकरे यांची ‘उत्तर’सभा ९ एप्रिलरोजी सायंकाळी साडे सहा वाजता ठाण्यात होणार आहे. याबाबत मनसेनी ट्वीट करत माहिती दिली आहे. तर सभेसाठी परवानगी मिळाली नाही तर रस्त्यावरच टेबल टाकून राज ठाकरे यांची सभा घेणार असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.
बाळा नांदगावकर गडकरी रंगायतन येथे सभेच्या जागेची पाहणी करण्यात ठाण्यात आले होते.त्यांनी पोलीस आयुक्त जयजित सिंह यांची भेट घेतली होती. त्यानंतर जागेची पाहणी केली. यावेळी बाळा नांदगावकर यांनी ठाण्यामध्ये सभेसाठी मोकळं मैदान नसल्याने सभा रस्त्यावरच घ्यावी लागणार असा इशारा दिला आहे. तसेच रस्त्यावर परवानगी मिळाली नाही तर तिथेच टेबल टाकून राज ठाकरे यांची सभा घेणारअसल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान राज ठाकरे यांची सभा तीन पेट्रोल पंपजवळील गजानन महाराज चौक येथे होण्याची शक्यता असून मनसेला हा पर्याय मान्य असल्याचे म्हटले जात आहे. परंतु पोलीस प्रशासन चाचपणी करून पुढील निर्णय घेणार आहे. कारण गडकरी रंगायतन येथे काव्य संमेलन तसंच आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नवरात्रौत्सव आयोजित आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
“कोंबडं कितीही झाकलं तरी पहाट व्हायची…”, काँग्रेसचा मोदींवर निशाणा
“…यामध्ये राज्य सरकारचे कोणतेही योगदान नाही”, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राणेंचा टोला
“शब्द मोजून वापरले पाहिजेत”; रोहित पवारांचा राऊतांना सल्ला
निवडणुका आल्या की राष्ट्रवादीही घेतेय हिंदुत्वाचा आधार, मग राज ठाकरेंवर टीका का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
