Share

IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीच्या ‘या’ जाहिरातीवर बंदी..! काय आहे कारण? जाणून घ्या

Published On: 

मुंबई : अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काऊन्सिल ऑफ इंडियाने (ASCI) आयपीएलला आपली जाहिरात मागे घेण्यास सांगितले आहे. या जाहिरातीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएलचा प्रचार करत आहे. रोड सेफ्टी ऑर्गनायझेशनने तक्रार केल्यानंतर एससीआयने ही शिफारस केली आहे. या जाहिरातीत वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. कंझ्युमर युनिटी अँड ट्रस्ट सोसायटीने या जाहिरातीविरोधात तक्रार दाखल केली होती.

या जाहिरातीत धोनीला बस ड्रायव्हर म्हणून दाखवण्यात आले आहे. यात वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध बस थांबवली जाते, अशा स्थितीत एक वाहतूक पोलीस त्याच्याकडे येतो आणि त्याची जाब विचारतो. तेव्हा धोनी आयपीएलची सुपर ओव्हर पाहत असतो, आणि हे पाहून ट्रॅफिक पोलीस ही गोष्ट ‘नॉर्मल’ समजून तेथून निघून जातात.

धोनीचा हा प्रमोशनल अॅड व्हिडिओ लवकरच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जेव्हा आयपीएलचा प्रश्न येतो तेव्हा चाहते कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतात, कारण ते सामान्य आहे, असे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!