मुंबई : चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) फलंदाज रॉबिन उथप्पाने त्याचा चांगला मित्र महेंद्रसिंह धोनीला ‘माही भाई’ असे संबोधणे किती विचित्र होते हे सांगितले. इतर खेळाडू त्याला त्याच नावाने हाक मारतात. उथप्पा सध्या आयपीएलमध्ये धोनीसोबत चेन्नईमध्ये खेळत आहे.
रवीचंद्रन अश्विनच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना उथप्पाने खुलासा केला. उथप्पा म्हणाला, ”आज त्याला माही भाई म्हणणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. कारण जेव्हा माझी त्याच्याशी ओळख झाली तेव्हा तो माही, धोनी होता. १३ वर्षांनंतर मी त्याच्यासोबत खेळलो. म्हणून, मी त्याला विचारले, मी तुला काय म्हणून हाक मारू? मी तुला माही भाई म्हणू का? कारण माझ्या आजूबाजूचे सर्वजण तुला असेच हाक मारतात. तो म्हणाला मला माही म्हण किंवा मला एमएस म्हण किंवा तुला जे आवडेल ते म्हण.”
उथप्पा म्हणाला, ”२००४ मध्ये मुंबईत चॅलेंजर ट्रॉफीदरम्यान मी धोनीला पहिल्यांदा भेटलो. त्यावेळी मालिकेत श्रीधरन श्रीरामही होता. त्याच्या माध्यमातून मी धोनीला भेटलो आणि मग आम्ही एकत्र हँग आउट करायचो.”
महत्त्वाच्या बातम्या –
- परवानगी मिळाली नाही तर रस्त्यावरच टेबल टाकून राज ठाकरे यांची सभा घेणार – बाळा नांदगावकर
- IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीच्या ‘या’ जाहिरातीवर बंदी..! काय आहे कारण? जाणून घ्या
- “मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है” म्हणत शालिनी ठाकरेंचा सुजात आंबेडकरांवर हल्लाबोल
- IPL 2022 : “चेंडू हवेत तरंगत होते…”, पॅट कमिन्सला आपल्या विक्रमी खेळीवर विश्वास बसेना; वाचा काय म्हणाला तो!
- “कोंबडं कितीही झाकलं तरी पहाट व्हायची…”, काँग्रेसचा मोदींवर निशाणा
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com


