Share

IPL 2022 : उचलबांगडी..! मैदानात घुसलेला चाहता विराटकडे धावू लागला, इतक्यातच….; VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या एलिमिनेटर सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपर जायंट्सला (LSG vs RCB) हरवत क्वालिफायरमध्ये प्रवेश केला. या सामन्यादरम्यान एक घङना घडली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. स्टॅंड्समध्ये बसलेल्या एका चाहत्याने मैदानात प्रवेश केला आणि विराट कोहलीकडे धावू लागला. पण त्यानंतर जे झाले, ते पाहून विराटलाही आपले हसू आवरता आले नाही.

मैदानात घुसलेल्या चाहत्याला पोलिसाने पकडले. त्याने त्या तरुणाला खांद्यावर उचलून मैदानाबाहेर नेले. कुस्तीच्या सामन्यात एखादा खेळाडू दुसऱ्या खेळाडूला जसे उचलतो, अगदी तसाच काहीसा प्रकार या पोलिसाने त्या तरुणासोबत केला. ही घटना पाहून विराटनेही त्याची नक्कल केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/ZlxComfort/status/1529709824216248321?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1529709824216248321%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Fcricket%2Fwatch-virat-kohli-stunned-as-kolkata-policeman-turns-john-cena-to-escort-fan-who-tried-to-meet-ex-rcb-captain-in-ipl-eliminator-vs-lsg-101653551837776.html

हा एलिमिनेटर सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात आला. प्लेऑफसाठी प्रेक्षकांवरील सर्व निर्बंध हटवण्यात आले होते, त्यामुळे ६० हजारांहून अधिक प्रेक्षक येथे पोहोचले होते. या सामन्यात बंगळुरूने २०७ धावा केल्या, प्रत्युत्तरात लखनऊ संघ १९३ धावाच करू शकला.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!