Share

IPL 2022 LSG vs RCB : लखनऊची एक्झिट..! कॅप्टन राहुलनं सांगितलं संघाच्या पराभवाचं कारण; म्हणाला, “खराब…”

Published On: 

मुंबई : लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आयपीएल २०२२ (IPL 2022) मधून बाहेर पडल्यानंतर संघाचा कर्णधार केएल राहुलने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. लखनऊला बंगळुरूकडून (LSG vs RCB) १४ धावांनी पराभूत व्हावे लागले. राहुलने संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण सांगितले. केएल राहुलच्या मते, खराब क्षेत्ररक्षणामुळे लखनऊ सुपर जायंट्सला आरसीबीविरुद्धच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर एलिमिनेटर सामना आरसीबी आणि लखनऊ यांच्यात झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने निर्धारित २० षटकात ४ गडी गमावून २०७ धावांची मजल मारली. रजत पाटीदारने जबरदस्त शतक झळकावले आणि ५४ चेंडूत ११२ धावांची नाबाद खेळी खेळली. प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जायंट्सचा संघ २० षटकांत ६ गडी गमावून १९३ धावाच करू शकला. कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक ७९ धावा केल्या मात्र संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

पराभवानंतर राहुल म्हणाला, ”माझ्या मते, खराब क्षेत्ररक्षणामुळे आम्ही हा सामना गमावला. जेव्हा तुम्ही सोपा झेल सोडता तेव्हा तुम्ही पुन्हा कधीही जिंकू शकत नाही. रजत पाटीदारच्या खेळीने मोठा फरक पडला. जेव्हा एखादा फलंदाज पहिल्या तीनमध्ये खेळताना शतक झळकावतो तेव्हा त्याचा संघ अनेकदा जिंकतो. आरसीबीने चांगले क्षेत्ररक्षण केले आणि आम्ही खराब क्षेत्ररक्षण केले.”

सामन्यादरम्यान लखनऊ सुपर जायंट्स संघाने क्षेत्ररक्षणादरम्यान अनेक झेल सोडले. त्यांनी रजत पाटीदारला दोनदा जीवदान दिले आणि त्याचा फटका संघाला सहन करावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!