Share

IPL 2022 LSG vs RCB : राहुलचा नाद करायचा नाय..! हरलेल्या मॅचमध्ये केला भीमपराक्रम; गेल-वॉर्नरला…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या या मोसमात उतरलेल्या लखनऊ सुपर जायंट्सला अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास करता आला नाही. त्यांना एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (LSG vs RCB) पराभव पत्करावा लागला. असे असले तरी लखनऊचा कर्णधार केएल राहुलने आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला आहे. राहुल चार मोसमात ६०० हून अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊला बंगळुरूकडून १४ धावांनी पराभव पत्करावा लागला. यासह लखनऊचे पहिल्या हंगामात जेतेपदावर कब्जा करण्याचे स्वप्न संपुष्टात आले. त्याचवेळी, या सामन्यात कर्णधार राहुलने ५८ चेंडूत ७९ धावांची खेळी खेळली आणि या हंगामात ६००हून अधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने १५ सामन्यात २ शतकांसह ६१६ धावा केल्या. त्याची सरासरी ५१.३३ अशी होती.

यापूर्वी त्याने २०२१ मध्ये ६२.६०च्या सरासरीने ६२६ धावा केल्या होत्या. त्यात ६ अर्धशतकांचा समावेश होता. २०२०मध्येही त्याने ६००हून अधिक धावा केल्या होत्या. त्याने या मोसमातील १४ सामन्यांमध्ये ६७० धावा केल्या, जे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील एका मोसमातील सर्वाधिक धावा देखील आहेत. या मोसमात एका शतकाचाही समावेश होता. २०१८ मध्ये त्याने १४ सामन्यात ६५९ धावा केल्या. २०१९ मध्ये तो ६०० धावा पूर्ण करण्यापासून ७ धावा दूर राहिला. त्याने या मोसमात १४ सामन्यात ५९३ धावा केल्या. सलग ५ वर्षे आयपीएलमध्ये ५९० हून अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

राहुलनंतर वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांनी आयपीएलच्या ३-३ हंगामात ६००हून अधिक धावा केल्या आहेत. गेलने २०११, २०१२ आणि २०१३ मध्ये सलग तीन हंगामात ६००हून अधिक धावा केल्या आहेत. तर वॉर्नरने २०१७ ते २०१९ या कालावधीत सलग ६०० हून अधिक धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!