मुंबई: राज्यात सध्या हनुमान चालीसा प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राणा दाम्पत्याना या प्रकरणी अटक झाली आहे. या पार्श्वभूमीवरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी आज (२५ एप्रिल) मुंबईत भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत हनुमान चालीसा भारतात नाही तर पाकिस्तानात म्हणायची का? असा प्रश्न उपस्थितीत केला. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.
BJP leadrs ask whthr readng #HanumanChalisa is angst law in Mah'tra?
No Sir,absolutely NOT!
BUT
using Hanuman fr politics & incitng violnce in hs name IS !
Chalisa is read in temples or b4 d idol.Readng it on roads is angst the religion!Not SEDITION, it's BLASPHEMY & by BJP! pic.twitter.com/cx31EpBq6n
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 25, 2022
“भाजप नेत्यांनी विचारले की हनुमान चालिसा वाचन महाराष्ट्रातील कायद्याविरोधात आहे? नाही, अजिबात नाही! पण हनुमानाचा वापर करून राजकारण आणि त्यांच्या नावाने हिंसा भडकावली जात आहे. हनुमान चालीसा मंदिरात वाचली जाते अशी रस्त्यांवर ती वाचणे म्हणजे धर्माच्या विरोधात आहे. हा देशद्रोह नाही तर भाजपकडून होणारी निंदा आहे.”, अशी टीका संजय राऊत यांनी ट्वीट करत केली आहे.
काय म्हणाले फडणवीस?
हनुमान चालीसा म्हणणं राजद्रोह असेल तर आम्ही रोज म्हणू. हनुमान चालीसा भारतात नाही तर पाकिस्तानात म्हणायची का? भाजपच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय. राज्यात सरकार हिटलरप्रमाणे वागतंय. मोहित कंबोज यांच्यावर मॉब लीन्चिंगसारखा हल्ला केला. झुंडशाहीला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ. मुंबईतील हल्ले मुख्यमंत्री कार्यालयाच्या तर राज्यभरातील हल्ले गृहमंत्र्यांच्या आदेशाने होत आहेत, असा थेट आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “नवनीत राणा यांना वॉशरूमला जाण्याची परवानगी दिली नाही”, देवेंद्र फडणवीसांची माहिती
- “हनुमान चालीसा भारतात नाही तर पाकिस्तानात म्हणायची का”?; फडणवीसांचा घणाघात
- IPL 2022 PBKS vs CSK : आज कोण ठरणार खरा किंग? हेड-टू-हेड आकडेवारीत ‘या’ संघाचं पारडं आहे जड!
- मुंबई आणि महाराष्ट्राला अशांत करण्याचा उद्देश आहे – मंत्री विजय वडेट्टीवार
- असं कुठे असतं का किरीटजी? “स्वतःच नखाने मारून रक्त काढता मग..”, रुपाली पाटलांचा खोचक टोला

