Share

“वय फक्त आकडाच, कार्तिक अजूनही भारतासाठी वर्ल्डकप खेळू शकतो”, आकाश चोप्राचं मत!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये दिनेश कार्तिकने दबावाखाली जबरदस्त फलंदाजी केली आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (RCB) फिनिशरची भूमिका बजावली आहे. कार्तिकने आतापर्यंत २०४.५५च्या ९० धावा केल्या आहेत आणि तो अद्याप स्पर्धेत आऊट होऊ शकलेला नाही. कार्तिक वयाच्या ३६व्या वर्षीही आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात पुनरागमन करू शकतो, असा विश्वास समालोचलक आकाश चोप्राने व्यक्त केला आहे.

आकाश चोप्रा म्हणाला, ”तो खरोखर चांगले काम करत आहे आणि वय हा फक्त एक आकडा आहे. मग तुम्ही कशाला काळजी करता? कोणी चांगले खेळत असेल तर वयाने फरक कसा पडतो? एक मोठी गोष्ट म्हणजे तो ज्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे, त्याच क्रमांकावरील फंलदाजाची टीम इंडियाला गरज आहे. पण त्याचे प्रतिस्पर्धी कोण आहेत हेही पाहावे लागेल. दीपक हुडा हा देखील स्पर्धक आहे, कारण तो थोडा ऑफ-स्पिन गोलंदाजी करतो.”

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 44 धावांची धडाकेबाज खेळी केली आणि संघाच्या संस्मरणीय विजयात योगदान दिले. कार्तिकने टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंड विरुद्ध २०१९ वर्ल्डकपमध्ये खेळला होता. त्यानंतर तो टीम इंडियात पुनरागमन करू शकला नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!