🕒 1 min read
मुंबई: आयपीएल २०२२ चा हंगाम अतिशय उत्साहात सुरू आहे. या १५ व्या हंगामातील ८ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज (KKR vs PBKS) यांच्यात आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात दोघांमध्ये दमदार स्पर्धा होणार आहे. पंजाब साठी मयंक नव कर्णधार आहे, तर कोलकात्याचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आहे.
दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. एकीकडे केकेआरचा संघ या हंगामातील दुसऱ्या सामन्यात आरसीबीविरुद्ध पराभूत झाली तर पंजाब किंग्ज आपल्या पहिल्या सामन्यात बंगळुरूला पराभूत करून मैदानात उतरत आहे. खरं तर, दोन्ही संघांकडे एक मजबूत आणि हार्ड हिटिंग प्लेइंग इलेव्हन आहे. पण, विजयासाठी केकेआर विरुद्ध पीबीकेएसला सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे. त्यामुळे हा सामना हाय व्होल्टेज होताना दिसू शकतो.
कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात बरोबरीची स्पर्धा पाहायला मिळते. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दोघेही २९ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यापैकी १९ वेळा निकाल कोलकात्याच्या बाजूने लागला आहे. तर पंजाब संघाने १० वेळा विजय मिळवला आहे. पण, सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे शेवटच्या ३ पैकी २ सामन्यात कोलकाता आपले लक्ष्य राखू शकला नाही. यावेळी आयपीएलमध्ये दोन्ही संघ स्टार्सने सज्ज आहेत, त्यामुळे या सामन्यातील टक्कर जोरदार होणार आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “…पण वराती मागून घोडं आलं तर उपयोग काय?”, भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा
- भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधत अमोल मिटकरींनी दिल्या ‘एप्रिल फुल’च्या हटके शुभेच्छा
- राज्यातील महिलांसाठी ‘तुमची अब्रू तुमची जबाबदारी’ हे धोरण आहे काय?; चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा
- ट्वीटरवर होतोय ‘BoycottHimalaya’ ट्रेंड; नेमके कारण काय?
- “अच्छा सिला दिया तूने…”, महागाईवरून नितीन राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
