Share

IPL 2022 KKR vs MI : रोहितला टी-२०मध्ये खुणावतोय मोठा विक्रम; आज ५४ धावा करताच….!

Published On: 

मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स हे संघ बुधवारी आयपीएलमध्ये चौदाव्या सामन्यात आमनेसामने येतील. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यात होणार आहे. या सामन्यात ‘हिटमॅन’ रोहित शर्मा दोन मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतो. मुंबईने चालू मोसमात खेळलेले पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत हा सामना त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, केकेआरने त्यांच्या ३ पैकी २ सामने जिंकले आहेत तर एक गमावला आहे.

रोहित शर्मा जर कोलकाताविरुद्ध ५४ धावा करण्यात यशस्वी ठरला तर तो टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करेल. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये ही कामगिरी करणारा तो विराट कोहलीनंतरचा दुसरा भारतीय ठरणार आहे. कोहलीने ३२८ टी-२० सामन्यांमध्ये एकूण १०३२६ धावा केल्या आहेत तर रोहित शर्माच्या ३७२ टी-२० सामन्यांमध्ये ९९४६ धावा आहेत. या यादीत म्हणजेच वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. गेलच्या नावावर ४६३ टी-२० सामन्यात १४५६२ धावा आहेत.

आज कोलकाता विरुद्धची आठवी धाव पूर्ण करताच रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी ४५०० धावा पूर्ण करेल. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो मुंबई इंडियन्सचा पहिला खेळाडू ठरणार आहे. रोहितने कोलकाताविरुद्ध एकूण १०१५ धावा केल्या आहेत. कोणत्याही एका फ्रेंचायझीसाठी १००० पेक्षा जास्त धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!