🕒 1 min read
पुणे : आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सला आपल्या पहिल्या विजयाची अजून वाट पाहावी लागणार आहे. पुण्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्थ रंगलेल्या सामन्यात मुंबईला ५ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. फक्त १५ मिनिटांमध्ये कोलकाताचा अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्सने सामन्याचे चित्र पालटत मुंबईकडून विजय हिरावून घेतला. कमिन्सने १५ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ५६ धावांची रेकॉर्डतोड खेळी केली.
मुंबईने विजयासाठी कोलकाताला २० षटकात १६२ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात कोलकाताने १४व्या षटकांपर्यंत १०१ धावांत ५ फलंदाज गमावले होते. आंद्रे रसेललाही स्वस्तात बाद करण्यात मुंबईला यश आले. पण सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले (१४ चेंडू) आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
यादरम्यान कमिन्सचा स्ट्राइक रेट ३७३.३३ असा राहिला. डॅनियल सॅम्सच्या एका षटकात त्याने ३५ धावा ठोकल्या. आता केएल राहुलसह कमिन्सचे नावही घेतले जाणार आहे. राहुलने २०१८मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १४ चेंडूत अर्धशतक केले होते. या विजयामुळे केकेआरने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
दोन्ही संघांची Playing XI
कोलकाता नाइट रायडर्स – अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरिन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिक सलाम, वरुण चक्रवर्ती.
मुंबई इंडियन्स – इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कप्तान), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : बेबी एबीच्या रुपात मुंबईला मिळाला खरा डिव्हिलियर्स? पदार्पणात खेळला ‘नो लूक’ शॉट; पाहा VIDEO!
- IPL 2022 MI vs KKR: रोहित शर्माचा ‘फेव्हरेट शॉट’च ठरला अडचणीचा, उमेश यादवने जाळ्यात अडकवले!
- IPL 2022 KKR vs MI : सूर्यकुमारचं दमदार पुनरागमन..! मुंबई इंडियन्सचं कोलकात्याला १६२ धावांचं आव्हान
- IPL 2022: ‘जेव्हा ‘तो’ चांगला खेळतो तेव्हा मला माझ्या स्वतःच्या मुलाने परफॉर्म केल्यासारखे वाटते’; एमएसके प्रसादचे मोठे वक्तव्य
- VIDEO : “तू कोहिनूर हिरा गमावलायस..”, जेव्हा गब्बरला मिळाला होता मुलीकडून नकार; वाचा नेमंक प्रकरण काय?
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
