🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर थेट टीका केली. म्हणाले, अर्थमंत्री अजित पवार यांनी विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही मुद्द्यावर काहीच उत्तर दिले नाही. यासह ठाकरे सरकारकडून धानाच्या संदर्भात एक रुपयांचा बोनस दिला जात नाही असे बोलत मुनगंटीवार यांनी थेट आरोप केला.
तसेच विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिली जात नाहीत असाही आरोप मुनगंटीवार यांनी केला. याचबरोबर “काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करण्याच्या 92 आमदारांच्या मागणीवर या सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत, राज्याच्या आर्थिक स्थितीची दाणादाण करण्याचं काम या सरकारकडून करण्यात आलं आहे. आम्ही जनतेमध्ये जाऊ आणि हे प्रश्न मांडू” असं देखील त्यांनी म्हटलंय.
प्रविण दरेकर यांच्यावर सूड भावनेने गुन्हा – मुनगंटीवार
प्रविण दरेकर यांच्यावर सूड भावनेने हा गुन्हा दाखल झाला आहे. अर्थसंकल्पातील चर्चेत त्यांनी सहभाग घेऊ नये आणि तणावात असावे यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा दावा मुनगंटीवार यांनी केला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
