Share

IPL 2022 : राजस्थान संघात गेल्यानंतर मलिंगा म्हणतो, “पहिली गोष्ट जी मनात आली ती…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना प्रशिक्षण देणार आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा यशस्वी गोलंदाज म्हणून मलिंगाने आपली कारकीर्द गाजवली, आता तो मुंबईविरुद्ध डावपेच आखेल. तत्पूर्वी मलिंगाने आपल्या नव्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया दिली.

राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाल्यानंतर मलिंगा म्हणाला, ”कोचिंगमध्ये येणे आणि युवा खेळाडूंना अनुभव देणे ही माझ्यासाठी नक्कीच नवीन गोष्ट आहे. मी याआधी मुंबईसोबत ही भूमिका साकारली आहे आणि आता राजस्थान रॉयल्ससोबत काम करताना मला आनंद होत आहे. माझ्यासाठी हे एक नवीन ठिकाण आहे, पण अशा प्रतिभावान गोलंदाजांसोबत काम करताना मी आतापर्यंतच्या माझ्या भूमिकेचा आनंद घेत आहे.”

नवीन संघाबद्दल विचारले असता मलिंगा म्हणाला, ”पहिली गोष्ट जी मनात आली ती म्हणजे गुलाबी रंग. या संघात मी नेहमीच चांगले स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू राहिले आहेत. जेव्हा मी त्यांचा सामना केला होता, तेव्हा ते कठीण होते. ते स्पर्धात्मक होते आणि कोणत्याही संघाला पराभूत करू शकणारे होते.”

राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकदाच विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर आजपर्यंत या संघाला विजेतेपद मिळालेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!