Share

IPL 2022: आयपीएलचे संघ दोन गटात वाटले जाणार ; वाचा कोणता संघ कोणत्या गटात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल स्पर्धा कोणत्या तारखेपासून सुरु होणार याची घोषणा झाल्यानंतर आता सामन्यांची वाटणी कशी होणार हे देखील जाहीर झाले आहे. यंदाच्या हंगामापासून स्पर्धेत १० संघ असणार आहे. यामुळेच आता आयपीएल मध्ये या १० संघाना दोन गटात वाटले गेले आहे. जेणेकरून सामने कसे खेळवले जाणार हे समजण्यास सोपे होईल.

आयपीएल मधील हे दहा संघ पाच-पाच असे ए आणि बी गटात वाटले गेले आहेत. ए गटात मुंबई इंडियन्स (MI), कोलकाता नाइट रायडर्स (KKR), राजस्थान रॉयल्स (RR), दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि ब गटात – चेन्नई सुपर किंग्स (CSK), सनरायझर्स हैदराबाद (SRH), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), पंजाब किंग्स (PBKS) आणि गुजरात टायटन्स हे असणार आहेत. हे गट कोणी किती विजेतेपद मिळवले यावर आधारित आहे.

आयपीएलसाठी तयार केलेल्या या गट रचनेत धोनीचे CSK आणि विराटचा RCB गट बी मध्ये एकत्र आले आहेत. याचा अर्थ CSK विरुद्ध RCB यांचा या मौसमात दोनदा सामना होणार आहे. “प्रत्येक संघ त्यांच्या गटातील संघांसह आणि दुसऱ्या गटातील एकाच रांगेतील संघासह दोनदा खेळेल. दुसऱ्या गटातील उर्वरित संघांसह ते हंगामात फक्त एकदाच खेळतील. असे बीसीसीआयच्या निवेदनात लिहण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!