Share

युक्रेन-रशिया युद्धात चीनची उडी; शी जिनपिंग पुतीन यांना फोन करत म्हणाले…

Published On: 

बीजिंग : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेत युक्रेनच्या संकटावर वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्याची भूमिका घेतल्याचे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना फोन केला आहे. चीनी मीडियाने शुक्रवारी ही माहिती दिली. जिनपिंग म्हणाले, पूर्व युक्रेनमधील परिस्थिती झपाट्याने बदलली आहे आणि रशिया आणि युक्रेनमधील प्रकरण चर्चेद्वारे सोडवण्यास चीन पाठिंबा देतो.

यापुर्वी, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी गुरुवारी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव्ह यांच्याशी फोनवर चर्चा केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेनमधील विशेष लष्करी कारवाईचा निषेध करण्यास चीनने नकार दिला आहे आणि सर्व संबंधितांना संयम बाळगण्याचे आणि तणाव अनियंत्रित होण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आहे.

चिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, लावरोव्ह  यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान वांग म्हणाले की, युक्रेनच्या संदर्भात या मुद्द्याला एक जटिल ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि चीन रशियाच्या सुरक्षेची चिंता समजून घेत आहे. चीनने नेहमीच सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला आहे, असा पुनरुच्चारही वांग यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!