मुंबई: डबल हेडरचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सचा आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला गेला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. सलामीवीर फलंदाज शुबमन गिलच्या (८४) अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने दिल्लीला १७२ धावांचे आव्हान दिले. ज्याचा पाठलाग करताना दिल्ली संघ २० ओव्हरमध्ये केवळ १५७ धावा करू शकला आणि गुजरातने १४ धावांनी स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला.
गुजरातच्या (GT vs DC) फलंदाजीत शुबमन गिलने (shubman gill) अप्रतिम खेळी केली. तर गोलंदाजीत दिल्लीच्या मुस्तफिजुरने ३ विकेट्स घेत गुजरातच्या वेगवान धाव गतीला ब्रेक लावला. ज्यामुळे ज्यामुळे शुबमन आणि हार्दिक वगळता दुसरे फलंदाज विशेष कामगिरीत करू शकले नाहीत. गुजरातच्या १७२ चा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीचे सलामीवीर अगदी सुरुवातीलाच लवकर बाद झाले. ज्यानंतर कर्णधार ऋषभने संघाला तारले.
ऋषभ पंतने (rishabh pant) २९ चेंडूत ४३ धावा केल्या. ज्यात ७ चौकारांचा समावेश होता. मात्र गुजरात प्रमाणेच दिल्लीचीही फलंदाजी ढासळताना दिसली. गुजरात कडून वेगवान फलंदाज लॉकी फर्ग्युसनने (lockie fergueson) ४ विकेट्स पटकावल्या. गुजरातच्या गोलंदाजीसमोर दिल्लीचे फलंदाजी तग धरू शकली नाही. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर लाईट यादव आणि पॉवेलने खेळी सांभाळण्याचे प्रयत्न केले मात्र तेही गुजरातच्या गोलंदाजीवर बाद झाले. सामन्यात एकूणच अप्रतिम कामगिरी करत गुजरातने नवखे असूनही स्पर्धेत येताच आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 GT vs DC : मुस्तफिजूरनं रोखली गुजरातची गाडी; दिल्लीला १७२ धावांचं आव्हान!
- राज ठाकरेंनी केली अजित पवारांनी नक्कल, पहा VIDEO
- IPL 2022 MI vs RR : राजस्थानचा मुंबईवर हल्लाबोल; नोंदवला सलग दुसरा विजय!
- IPL 2022 : गुजरातला टक्कर देण्यास दिल्ली तय्यार! नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय
- “गरज सरो अन् धनगर मरो, हे…”; पडळकरांची पवारांवर जोरदार टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

