Share

IPL 2022 : गुजरातला टक्कर देण्यास दिल्ली तय्यार! नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: डबल हेडरचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सचा आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. आयपीएल २०२२ मधील हा १० वा सामना असेल. नाणेफेक जिंकत दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांबद्दल मनोरंजक गोष्ट म्हणजे दोन्ही संघांनी स्पर्धेचा पहिला सामना जिंकला आहे. अशा स्थितीत दोन विजेत्या संघांमधील सामना खूपच रोमांचक होणार आहे.

दोन्ही संघात अनेक स्टार्स आहेत. गुजरात (GT) संघ नवखा असूनही पहिल्याच सामन्यात शानदार कामगिरी करत त्यांनी सगळ्यांना प्रभावित केले आहे. हार्दिक पंड्याने कर्णधार म्हणून विजयाने सुरुवात केली आहे. तर ऋषभ पंतच्या दिल्लीनेही (DC) जोर दाखवला आहे. दोन्ही संघाची गोलंदाजी युनिट भक्कम आहे. ज्यामुळे या सामन्यात त्यांच्यात मोठी चुरस होताना दिसेल. या विकेटवर पहिल्या डावातील सरासरी १५९ धावांची आहे. ज्यामुळे ऋषभाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय किती खरा ठरतो हे समजेल.

दिल्ली कॅपिटल्स XI : पृथ्वी शॉ, टीम सेफर्ट, मनदीप सिंग, ऋषभ पंत (w/c), ललित यादव, रोवमन पॉवेल, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, मुस्तफिजुर रहमान

गुजरात टायटन्स XI : शुभमन गिल, मॅथ्यू वेड (w), विजय शंकर, हार्दिक पंड्या (c), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर सदारंगनी, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, वरुण आरोन, मोहम्मद शमी

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!