Share

IPL 2022: गुजरातचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; पंजाबमध्ये ‘या’ स्टार खेळाडूचे पर्दापण!

Published On: 

मुंबई: आयपीएलच्या १६ व्या सामन्यात आज हार्दिकच्या (Hardik pandya) गुजरात टायटन्सचा सामना मयंक अग्रवालचा (mayank agrawal) पंजाब किंग्ज (GT vs PBKS) करणार आहे. गुजरातने प्रथम नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर पंजाब संघात जॉनी बेअरस्ट्रोचे पर्दापण झाले आहे. तर गुजरात संघात साई सुदर्शन आणि दर्शन नळकांडे या युवा खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे.

मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात पीच मुख्य भूमिका बजावेल. गेल्या काही सामन्यांवर नजर टाकली तर ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल दिसते. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे खूपच सोपे दिसत असले तरी या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांनाही खूप मदत मिळते. पहिल्या डावात फलंदाजी करणे दुस-या डावाच्या तुलनेत अवघड वाटते, इथे पहिल्या डावाची सरासरी १६५ धावा आहे. तसेच ड्यूचा मुद्दाही महत्वाचा ठरू शकतो. त्यामुळे हार्दिकचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय कसा ठरेल हे सामना सुरु झाल्यावर समजेल.

दोन्ही संघ
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल (C ), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो (W), जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू वेड (W), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (C), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!