मुंबई : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी अभिनित ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल १४ कोटी रुपयांची कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनाबाबत ताजी बातमी समोर आली आहे.
तरण आदर्श यांनी सांगितले की, कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया २’ ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ६६ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार, सोमवारी या चित्रपटाने १०.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तरण आदर्श यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, हा चित्रपट पहिल्या आठवड्यात ८८ कोटी रुपयांची कमाई करू शकतो. याआधी देखील तरण आदर्श यांनी सांगितले होते की, या चित्रपटाने शुक्रवारी १४.११ कोटी, शुक्रवारी १९.३४ आणि रविवारी २३.५१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
#BhoolBhulaiyaa2 passes the make-or-break Monday Test… Collects in double digits – the second *#Hindi film* to hit double digits on *Day 4* in 2022… Eyes ₹ 88 cr [+/-] in Week 1… Fri 14.11 cr, Sat 18.34 cr, Sun 23.51 cr, Mon 10.75 cr. Total: ₹ 66.71 cr. #India biz. pic.twitter.com/2PJ4H5ls44
— taran adarsh (@taran_adarsh) May 24, 2022
विकेंड कलेक्शनच्या बाबतीत कार्तिकचा हा सर्वात यशस्वी चित्रपट आहे. ‘भूल भुलैया २’ने पहिल्या विकेंडमध्ये ५५.९६ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आणि कियारा यांच्यासोबत अनेक सहकलाकारांनी काम केले. प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाच्या यशाबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या दोघांनीही कार्तिक आर्यनच्या कामाचे कौतुक केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


