मुंबई : महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात वेलोसिटी संघाने सुपरनोव्हास संघाचा ७ गडी राखून पराभव केला. सुपरनोव्हासने दिलेल्या १५० धावांच्या लक्ष्यचा पाठलाग करताना वेलोसिटी संघाने १९व्या षटकात सात गडी राखून विजय मिळवला आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. सामन्याच्या सुरुवातीला वेलोसिटी संघाची कर्णधार दीप्ती शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
वेलोसिटीचा डाव
सुपरनोव्हास संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेलोसिटीची सलामीवीर नात्थाकन चंथम लवकरच बाद झाली. यानंतर सलामीवीर शेफाली वर्माने तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या यास्तीक भाटिया सोबत धावफलक चालता ठेवला. शेफाली ने जलद अर्धशतक ठोकत ५१ धावांची तुफानी पारी खेळली. शेफाली आणि यास्तिक भाटिया बाद झाल्यानंतर लॉरा वोल्फर्ड ५१ धावा आणि कर्णधार दीप्ती शर्मा २४ धावा यांच्या महत्वपूर्ण खेळीने संघाला विजय मिळवून दिला. वेलोसिटीने १९व्या षटकातच तीन गडी गमावून १५० धावांच्या लक्ष्याचा सहज यशस्वी पाठलाग केला. सुपरनोव्हासकडून गोलंदाजी करताना डिआंड्रा डॉटिनने सर्वाधिक ४ बळी मिळवले. तर सोफी एक्लेस्टोन आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
A win for Velocity! ???? ????
A solid show from @Deepti_Sharma06 & Co. as they beat Supernovas by 7⃣ wickets. ???? ????
Scorecard ???? https://t.co/ey7pHvLcGi#My11CircleWT20C #SNOvVEL pic.twitter.com/iVaWKAScae
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022
सुपरनोव्हासचा डाव
सुपरनोव्हास संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिले तीन गडी लवकरच गमावले. मात्र त्यानंतर तानिया भाटिया (३६ धावा) आणि कर्णधार हरमंप्रीत कौर (७१ धावा) यांनी संघासाठी महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यादरम्यान हरमनप्रीत कौरने महिला टी २० चॅलेंज स्पर्धेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर सुन लुस हिनेही चांगली खेळी करत २० धावा केल्या व संघाची धावसंख्या १५० वर पोहोचवली. वेलोसिटी संघाकडून गोलंदाजी करताना कॅट क्रॉस तिने सर्वाधिक दोन गडी बाद केले. तर कर्णधार दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांना प्रत्येकी १-१ गडी बाद करण्यात यश आले.
दोन्ही संघांची Playing 11
सुपरनोव्हास – डिआंड्रा डॉटिन, प्रिया पुनिया, सुन लुस, हरमनप्रीत कौर (कप्तान), हरलीन देओल, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), सोफी एक्लेस्टोन, अलाना किंग, व्ही. चंदू, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग.
वेलोसिटी- शेफाली वर्मा, नात्थाकन चंथम, लॉरा वोल्फर्ड, यस्तिका भाटिया (व.), दीप्ती शर्मा (सी), किरण नवगिरे, स्नेह राणा, राधा यादव, केट क्रॉस, अयाबोंगा खाका, माया सोनवणे
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

