मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) चा विजयी संघ कोण ठरणार हे काहीच तासात समजणार आहे. दरम्यान या अंतिम सामन्याआधी एक क्लोजिंग सेरेमनी पार पडली त्यामध्ये दिग्गज बॉलिवूडकर परफॉर्म करताना दिसले. अंतिम सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. दरम्यान हा सामना ८ वाजता सुरू होणार असून त्यापूर्वी क्लोजिंग सेरेमनीच्या जल्लोषात संपुर्ण मैदान दुमदुमले.
आयपीएल ही क्लोजिंग सेरेमनी शेवटची २०१८ साली झाली होती. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यात जवान शहीद झाल्याची दु:खद घटना घडल्याने हा कार्यक्रम रद्द झाला होता. तर २०२० आणि २०२१ मध्ये कोरोनामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र यावर्षी हा कार्यक्रम पुन्हा आयोजित करण्यात आला आणि यामध्ये बॉलिवूडमधील कलाकारांनी त्यांच्या कलाकृतींनी संपूर्ण मैदानात चाहत्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. ऑस्कर विजेते संगीतकार-गायक एआर रहमान, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि गायिका नीती मोहन यांनी यावेळी परफॉर्म करत लाखो चाहत्यांची मने जिंकली.
Jai Ho! ???? ????@arrahman & Co. are joined by @RanveerOfficial on stage! ???? ????#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/GkOKOIiggG
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
Vande Mataram ???????? @arrahman's magical performance will touch your hearts. #TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/ixvjn9vlRT
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
अभिनेता रणवीर सिंह याने देखील त्याच्या डान्सच्या शैलीने सर्व चाहत्यांनाही नाचवले. रणवीरच्या डान्सदरम्यान स्टेडियम मध्ये सर्वत्र चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पसरले होते. याशिवाय अंतिम सामन्यादरम्यान पहिल्या इनिंगच्या दुसऱ्या स्ट्रॅटेजिक टाइमआउटला ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमाचा ट्रेलर देखील लाँच होणार आहे. अर्थात आज क्रिकेट आणि मनोरंजन अशी मेजवानी प्रेक्षकांसाठी असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

