मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज गुजरात टायटन्सचा सामना पंजाब किंग्ज (GT vs PBKS) सोबत होणार आहे. आयपीएलमधील दोन्ही संघांमधील हा दुसरा सामना आहे. हा सामना मुंबईतील डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे संध्याकाळी साडेसातपासून खेळवला जाईल. स्पर्धेतील या ४८व्या सामन्यात सुसाट गुजरात फेव्हरिट मानली जात आहे.
आयपीएलच्या १५व्या मोसमात, गुजरात टायटन्सने आतापर्यंत ९ सामन्यांत ८ विजय नोंदवले आहेत आणि गुणतालिकेत ते शीर्षस्थानी आहेत. दुसरीकडे, पंजाब किंग्जने आतापर्यंत ९ पैकी केवळ ४ सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत ते सातव्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पंजाब किंग्जला पराभवाच्या पार्श्वभूमीवर हा सामना जिंकणे आवश्यक आहे.
The first and only ????????
Stuff of dreams this #SeasonOfFirsts, courtesy all our Titans ????#AavaDe #TATAIPL pic.twitter.com/us7ymEY1fK
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 3, 2022
हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया, डेव्हिड मिलर यांनी गुजरातसाठी चमकदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे पंजाबच्या फलंदाजीची जबाबदारी शिखर धवनवर दिसत आहे. मयंक अग्रवाल फॉर्ममध्ये नसणे ही संघासाठी चिंतेची बाब आहे. आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत फक्त एकच सामना झाला असून त्यात गुजरात टायटन्सने बाजी मारली आहे. ८ एप्रिलला खेळलेला सामना गुजरातने ६ गडी राखून जिंकला होता.
उभय संघांमधील शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जकडून लियाम लिव्हिंगस्टोनने २७ चेंडूत ६४ धावा केल्या. पंजाब किंग्जविरुद्ध गुजरात टायटन्सकडून सलामीवीर शुबमन गिलने ९६ धावांची शानदार खेळी केली. गुजरातविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात कगिसो रबाडाने पंजाबकडून २ बळी घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

