Share

IPL 2022 : शुबमन गिलनं Swiggyला फटकारलं..! एलोन मस्ककडं केली ‘ही’ भन्नाट मागणी; वाचा तर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये, गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुबमन गिल चांगली कामगिरी करत आहे. त्याने १५व्या मोसमात आतापर्यंत २२९ धावा केल्या आहेत. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे गुजरातचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यापासून केवळ एक विजय दूर आहे. शुबमन गिल त्याच्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे अनेकदा चर्चेत असतो. मात्र यावेळी तो एका खास ट्वीटमुळे चर्चेत आला आहे.

शुबमन गिलने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांना स्विगी खरेदी करण्याचे आवाहन केले होते. अलीकडे, मस्क यांनी ट्विटर ४४ अरब डॉलरमध्ये विकत घेण्यास स्वारस्य दाखवले होते, जे बोर्डाने स्वीकारले आहे. टीम इंडिया आणि गुजरात टायटन्सचा फलंदाज शुबमन गिलने २९ एप्रिल रोजी रात्री ११:०१ वाजता ट्वीट केले. “एलोन मस्क कृपया स्विगी खरेदी करा. त्यामुळे ते वेळेवर डिलिव्हरी करू शकतात”, असे शुबमनने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.

सध्या गिलला मस्ककडून प्रतिसाद मिळाला नाही. पण स्विगीने त्याला नक्कीच प्रतिसाद दिला. स्विगीने लिहिले, “आम्ही अजूनही टी-२० क्रिकेटमध्ये तुमच्या फलंदाजीपेक्षा वेगवान आहोत.”

https://twitter.com/swiggysgs/status/1520099978269839360

शुबमन गिल हा आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सचा भाग आहे. या मोसमात त्याची कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे. त्याने गुजरात टायटन्ससाठी आतापर्यंत ८ सामने खेळले असून, सर्व डावात त्याने २२९ धावा केल्या आहेत. यादरम्यान गिलने २ अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे गुजरात टायटन्सचा संघ प्लेऑफच्या उंबरठ्यावर उभा आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!