🕒 1 min read
औरंगाबाद:आगामी महापालिका निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने लढविणार आहे. त्यादृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी (दि.३१) मनसेच्या उस्मानपुरा येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे(Dilip Dhotre), मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन(Prakash Mahajan), राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी(Satnamsingh Gulati), जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर(Sumit Khambekar) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मनपा निवडणूकीच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला.
या बैठकीत नेत्यांनी, शहरात मनसेच्या शाखा उदघाटनाचा जो धडाका सुरु आहे त्याचा आढावा घेतला. तसेच, शाखा अध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष यांची वैयक्तीक भेट घेऊन चर्चा केली. मनसे गट अध्यक्ष निवडीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे मनसे विद्यार्थी सेना, महिला सेना, वाहतूक सेना, चित्रपट सेना, सोशल सेल या सर्व प्रमुख विभागाची सविस्तर बैठक घेण्यात आली. मनसे शहराध्यक्ष गजानन गौडा आणि आशिष सुरडकर यांनी जानेवारी महिन्याचा पक्ष कार्याचा अहवाल मांडला.
तसेच फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा नेत्यांनी या बैठकीत घेतला. या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर नेत्यांनी मनसे नवीन कार्यकारणीच्या कामाचे कौतुक केले. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त पक्ष वाढीकडे लक्ष केंद्रीत करण्याचे आणि गट अध्यक्षांचे काम वाढवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या. या बैठकीत अशोक पवार पाटील,राजू जावळीकर, संकेत शेट्ये, मंगेश साळवे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- “अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दोन वर्ष फुकट गेली, याला सर्वस्वी जबाबदार मोदी सरकार”, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
- “मुख्यमंत्री दारात वाईन… मद्यधुंद सरकारची नशा कधी उतरणार?”, चित्रा वाघ यांचा सवाल
- २१वे ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या राफेलला मास्टर ब्लास्टर सचिनकडून अनोख्या शुभेच्छा
- लग्नसमारंभासाठीच्या निर्बंधात बदल; जाणून घ्या किती जणांना असेल परवानगी
- “तुम अपनी जलन बरकरार रखो, हम अपना जलवा…”, संजय राऊतांचा विरोधकांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
