Share

अक्कल गुडघ्यात असणे ही अभिमानास्पद दैवी देणगी आहे काय?; चित्रा वाघ यांचा शिवसेनेला टोला

Published On: 

मुंबई: कारागृहातून सुटका झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवण्याचे आव्हान दिले होते. यावरच शिवसैनिकांकडून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाचा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ‘आमची अक्कल गुडघ्यामध्ये असते, आम्ही जाऊन सरळ काहीतरी करू शकतो’, असे म्हटले होते. तर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यावरून शिवसेनेला टोला लगावला आहे.

“आम्ही शिवसैनिक, आमची अक्कल गुडघ्यात, काहीतरी करू शकतो. असा इशारा चंद्रकांत खैरेंनी नवनीत राणांना दिला आहे. अक्कल गुडघ्यात असणे ही अभिमानास्पद दैवी देणगी आहे काय? खैरे यांची भाषा धमकीची व चिथावणीखोर असून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह उभी करते.”, असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत खैरे?

नवनीत राणांबद्दल मी काहीच बोलत नाही. मला त्या बाईचा खूप राग आला आहे. त्या उद्धव ठाकरेंबद्दल काहीही बोलतात. आम्ही शिवसैनिक, आमच्या डोक्यात एक वेगळी अक्कल असते. किंवा आमची अक्कल गुडघ्यामध्ये असते. आम्ही जाऊन सरळ काहीतरी करू शकतो.  कारण ते दैवत आहेत आमचे. असे चद्रकांत खैरे यांनी म्हटले होते.

काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?

कारागृहातून सुटका झाल्यानंतर प्रकृती बरी नसल्याने नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना नवनीत राणा यांनी म्हटले की, “मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा. महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक महिला उभी राहून लढून दाखवेल.”,

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!