मुंबई : चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेला मुकणार असल्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे. दीपक चहर कोलकाता येथे वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चहर स्पर्धेतून आठ आठवडे बाहेर असण्याची शक्यता आहे. तो लवकर बरा झाल्यास अर्ध्या उरलेल्या स्पर्धेत खेळू शकतो.
IPL मेगा ऑक्शनमध्ये दीपक चहरला (Deepak chahar) CSK ने तब्बल १४ कोटी रुपयांना विकत घेतले आहे , जे या वर्षीच्या IPL ऑक्शनमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी खरेदी ठरली आहे. २० फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे वेस्ट इंडिज विरुद्धच्या अंतिम T20 मध्ये खेळताना चहरला दुखापत झाली होती आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतून तो बाहेर पडला होता.
आपल्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, दीपक चहरने सात एकदिवसीय आणि २० टी-२० सामन्यांतून अनुक्रमे १० आणि २६ विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाजी सोबतच चहरने फलंदाजीतही भारतासाठी अष्टपैलू कामगिरी केली आहे. एकदिवसीय सामन्यात नाबाद ६९ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या असून त्याने दोन अर्धशतके ठोकली आहेत. चहर सध्या बँगलोर येथे एनसीए मध्ये आहे. IPL 2022 स्पर्धा २६ मार्च ते २९ मे पर्यंत देशात खेळवण्यात येणार आहे. दीपक चहरचे स्पर्धेतून बाहेर पडणे चेन्नईसाठी मोठा धक्का ठरेल.
महत्वाच्या बातम्या
- State Budget Session 2022 : भाषण न करताच राज्यपाल कोश्यारी निघून गेले; काय होते कारण?
- “केंद्राची करणी आणि यांची फक्त पाहणी”, आदित्य ठाकरेंना भातखळकरांचा जोरदार टोला
- स्वाभिमानीचे ४ मार्चला महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन
- VIDEO : विराटला १००व्या कसोटी सामन्यासाठी सचिन तेंडुलकरकडून विशेष शुभेच्छा
- State Budget Session 2022 : विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचे आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

